भन्नाट हवा सुटलिये
मझी पतंग हवेत हेलकवे खतेय…
सुर्य मात्र त्रास देतोय…
कोण जाणे उगाच मधे-मधे करतोय..
अरे बाबा तुला माहीत नाहीये का…?
आज संक्रांत आहे म्हणुन..
का मला पतंग उडवु देत नाहीस..
बघ हवा सुध्धा गेलि आता.
हम्म… छान वास येतोय…
कसला वास आहे हा…?
अरे… हा गरम-गरम भज्यांचा वास आहे..
आई बोलावतेय.. म्हणतेय चल लवकर जेवण करुन घे,,,,
अरे पण लक्ष आहे कुणाचं…
माझं पुर्ण लक्षं तर माझ्या पतंगी कडे आहे…
अरे ते बघ कुणाची तरी पतंग कट्ली…..
अरे-अरे पकडा तिला….
सकाळची संध्याकाळ झाली..
माझं अजुनही पुर्ण लक्षं मझ्या पतंगीकडेच आहे..
पण आता पोटात कावळे कोकलायला लागलेत..
चला तर मग… घरी जाउन थोडंस जेवन करतो..
तुम्हीही कर…
अरे…. विसरलोच… मकर संक्रांतिच्या आपण सर्वांना खुप-खुप शुभेछ्चा……!






ताज्या प्रतिक्रिया