
डिसेंबर २००६… मधे प्रायोगिक तत्वावर सुरु केलेले भारतातले पहीले ’बस रॅपीड ट्रांसपोर्ट’. असं वाटायला लागलय की हा प्रयोग पुणेकरांच्या बोकांडीवर बसायला लागला आहे. ह्या बिआरटी मधे १३ कि.मी. चा रस्ता वापरण्यात आलेला आहे. यावत एयर कंडीशंड वोल्वो बसेस धावतात. तिन रुट वापरले गेले आहेत यात. १.कात्रज २.स्वारगेट आणी ३.हडपसर.
आता यात शासनाचा किती फायदा आहे..? हे आपल्याला पहीले समजुन घ्यायला पाहीजे. पहीले तर एयर कंडीशंड वोल्वो बस यावर धावत असल्यामुळे सामान्य नागरीकाची इच्छा असो किंवा नसो, जादा भाडं देउन बस बोर्ड करावी लागते. कारण पि. एम. टी. कर्मचार्यांना कुठल्याही माणसाच्या वेळेची कदर नाही. मग तो कुणी म्हातारा असो किंवा स्त्रिया असोत. ते आपल्या मनाने गाडी पळवणार, जर कुणी प्रश्न विचारायची हीम्मत केलीच तर त्यांच्याकडे उत्तर तयारच आहे.. “मग स्वतःच्या गाडीने प्रवास करा”. दुसरी गोष्ट म्हणजे आणी गाड्यांना भरपुर ऍव्हरेज मिळतो म्हणजे इथेही शासनाचाच फायदा.
आज सकाळचीच गोष्ट आहे मी ऑफिस संपऊन घारि जात होतो एक काळ्या रंगाची स्विफ्ट डिझायर, हडपसर जवळ क्रोम मॉल जवळ बिआरटी च्या डिव्हायडर वर चढलेली होती. गाडीचं भरपुर नुकसान झालेलं होतं. आपल्याला माहीत आहे. थोड्या वेळाने हा गाडीवाला टोईंग वाल्यांना बोलाउन गडी घेउन जाणार, त्या आधी पोलिस येउन पंचनामा करणार. पण भुर्दंड कुणाला शासनाला…? नाही.. गाडी मालकाला.
आता तुम्ही म्हणनार चालकाची चुक होती, पण मला सांगा ह्या बिआरटी ने किती रस्ता व्यापलेला आहे…? जवळपास अर्द्यापेक्षाही जास्त. त्यात तुटलेले डिव्हायडर आहेत. एकही ग्लोसाईन काम करेनासं झालं आहे. आता ही सुद्धा चालकाचीच चुक का…? अरे जर आम्हाला जयला रस्ता जर नसेल तर आम्ही पण बिआरटी च्याच मार्गाने गाडी चालवनार. जर वाहतुक पोलीसांनी पकडलच तर १०० रुपये देउन सुटनार, आता मला पोलिस खात्याबद्दल जास्त बोलायच नाही आहे, आणी वाहातुक पोलिस तर सोडुनच द्या. अशी जवळपास सर्व पुणेकरांची मनस्थिती झालेली आहे. बरं यात सर्वात मोठा हात आहे प्रायव्हेट कंपन्यांमधल्या कॅब वाल्यांचा. त्यांना बिआरटी आणी सामान्य रस्ता यातला फरक माहीतच नाही ते नुसत गाडी कशी दामटायची हेच जाणतात. दुसरा नंबर आहे तो, पल्सर आणी यामाहा चालवणार्या कारट्यांचा. त्यांना असं वाटतं की कुठलाही रस्ता आपल्या तिर्थरुपांनीच बांघलेला आहे. मग ते स्वारगेट असो की सिंहगड रोड असो. आणी त्यातल्या त्यात जर एखादी कन्यका जर मागे बसलेली असेल तर मग हे त्या टु व्हिलर वर बसलेले असतानाही बोईंग ७४७ मधे बसलेले असल्याचा अभाव आणतात आणी अश्या प्रकारे गाडी पळवतात की, बघणार्याचा जिवही वरखाली होतो.
बरं या सर्वात कुणी सामान्य नागरीकांची पर्वाच करत नाही. ज्या ठीकाणी बस स्टॉप आहेत त्या ठी काणी जवळपास आठ फुटांचा रस्ता पार करुन त्या बस स्टॉप वर यावं लागतं. सकाळी ८ ते दुपारी १ वाजे पर्यंत ह्या रस्त्यांवर इतकी गर्दी असते की माझ्या सारखा धट धाकट माणुस सुद्धा रस्ता पार करु शकत नाही, आणी करायचा म्हटल्यास जिव हातात घेउनच करावा लागतो. बाय द वे मला हे आज पर्यंत न उलगडलेलं कोडं आहे, की हे पीएमटी चालक स्वतःला काय समजता…? फॉर्म्युला वन ड्रायव्हर…? अरे इतकी जवळ आणुन बस थांबवतात की वाटतं थोडा जर निशाना जर चुकला तर गेलाच समजा आपला हत किंवा पाय. अरे कधी-कधी तर सरळ अंगावर गाडी घालतात. हात दाखवल्याशीवाय गाडी थांबवत नाही. दे आर सपोज टु स्टॉप ऍट एव्हरी स्टॉप. पण नाही अरे आजकाल तर म्हातार्या लोकांना सुद्धा पुढच्या गेटने चढु देत नाहीत. नाही तेव्हा लोंढा भरतात गाडित नाही तेव्हा हडपसर पासुन स्वारगेट पर्यंत गाडी रिकामी नेतात. याचा काय अर्थ.
जेव्हा सर्वांना माहीत आहे की या बिआरटी मुळे पुण्यातल्या नागरिकांना काहीच फायदा झालेला नाही तर मग कशाला बिआरटी केलय. खर सांगायच झालं तर आधीही स्वारगेट ते कात्रज जायला ३५ मिनिटे लागायची आणी आताही तितकीच लागतात. बरं ह्या हडपसर रोडवर बिआरटी रोडच्या मधे इतके मोठे डिव्हायडर लावले आहेत, त्यानंतर सायकल वाल्यांसाठी वेगळा रस्ता केलेला आहे, पाई चालणार्यांच काय. का फक्त बिआरटी आणी पाई चालणारेच आहेत का पुण्यात…?
दर दिवसाला सोलापुर रोडवर ऍक्सीडेंट्स होतायत, त्यासाठी प्रशासन काय करतय..? काहीच नाही. आणी आता सिंहगड रोडला बिआरटी जोडणार आहेत असं मी ऐकलयं. अरे जरा या शासकीय अधिकार्यांना म्हणा की जरा दोन दिवस संतोश हॉलच्या चौकात सायंकाळी ६ ते ९ च्या दरम्यान टु व्हीलर वर जाउन दाखवा. मग म्हणतो खरच “है दम…?” अरे कीती पैसा बळकावणार. बस झालं आता, आम्हाला नावं घ्यायला मजबुर करु नका… वेळीच हे बिआरटी नावाचं कुत्रं आवरा.. नाहीतर परिणाम फार वाईट होतिल….






sorry, mala ya badal jasta mahit nahi mhanun mi kontich pratikriya lihu shakat nahi……….
By: anjusha s on डिसेंबर 19, 2009
at 11:28 सकाळी
he BRT. prakran jastach trasdayak aahe. nimmyachya var rasta BRT vyapnar aani tyavarun fakta local buses dhavnar. baki private, S.T. chya buses bajuchya jagevarun dhavnar. tee jagasuddha kiti arunda, shivay tithe ricksha, cars yancha sulsulat astoch. tyapexa sarva rasta mokla karun pahilyapramanech local buses jane jasta soyiskar.
By: Seema Tillu on डिसेंबर 19, 2009
at 4:40 pm
Seema barobar aahe aapal mhaNan. hach tar problem aahe aapaly kade… kuThlyhee goshticha niyojan he kasa karav he yaana kalata naahee….!
By: ajayshripad on डिसेंबर 20, 2009
at 11:40 pm
तुमचा नक्की काय गोंधळ आहे? तुम्ही आधी सामान्य माणसाची व्याख्या करा. बाईकवाले, गाडीवाले, पायी चालणारे, बसमधून गर्दी करून प्रवास करणारे यांना तर आधीच बाजूला केलंत…
आता उरलं कोण??????????
By: आल्हाद alias Alhad on डिसेंबर 19, 2009
at 10:07 pm
अल्हाद साहेब आपण कुठल्या बजुने उभे रहुन मल ह प्रश्न विचारताय हे मला आताही समजलेले नाही….
सामान्य माणुस जो मझ्या किंवा कदाचित तुमच्याही सारखा असु शकतो जो १२ तास ऑफिस मधे काम करुन थकुन भागुन घरी जातो, व त्याच वेळी या बिआरटी मुळे वटेत ट्राफीक जॅम झालेला असतो. व घरि जायला ज्या रस्त्यावर २० मिनीटे लागतात त्याच ठिकाणी १ तास लागतो. जर तुम्हाला ईतकं सांगुनही सामान्य माणसाची व्याख्या समजत नसेल तर मी आपली काहिही मदत करु शकत नाही….
By: ajayshripad on डिसेंबर 20, 2009
at 11:50 pm
बी आर टी ची कल्पना ज्याने मांडली असेल ज्यांनी प्रत्यक्षात अमलात आणली असेल त्या सर्वाना बी आर टी च्या रस्त्यावर PMT च्या बस खाली ठार मारले पाहिजे म्हणजे पुढे नौकरशाही आणि नेते असे मूर्खपणाचे निर्णय घेणार नाहीत.
By: thanthanpal on जानेवारी 15, 2011
at 9:02 pm
नक्कीच किंवा त्यांना रोज दुपारी ११ ते २ च्या दरम्यान फ़क्त रस्ता क्रॊस करयला सांगावा….
बस खालि देउन मारायची गरजच नाही…!
By: ajayshripad on जानेवारी 16, 2011
at 3:57 pm