रोज सायंकाळी ती मला भेटायची,
मोगर्याचा गजरा आणी डोळ्यात काजळ लाउन.
दिवसभरचा थकवा एका क्षणात पार कुठेतरी पळायचा
आणी उरायचा तो फक्त मंद-मंद मोगर्याचा सुवास.
रोज सायंकाळी ती मला भेटायची,
गर्दीत वेगळीच उठुन दिसायची.
तलम रेशमी ओढणीला तिच्या स्पर्श होताच,
प्राजक्तांच्या फुलासारखी भासायची.
रोज सायंकाळी ती मला भेटायची,
घाई-घाई यायची आणी लवकर जाते म्हणायची.
मी बळेच तिचा हात धरल्यावर,
लाजुन चुर-चुर व्हायची.
रोज सायंकाळी ती मला भेटायची,
जरा वेळ जवळ येउन बसायची.
अंधार पडायला लागला की,
रानात एकट्या सापडलेल्या हरणीसारखी घाबरायची.
आता सायंकाळी मी एकटाच असतो,
मनातल्या आठवणींना उजाळा देत असतो.
तिच्या आठवणी कधी संपतच नाहीत,
लपुन राहतात मनाच्या कोपर्यात कुठेतरि…..






surekh
By: akhiljoshi on डिसेंबर 16, 2009
at 11:39 सकाळी
Dhanyvad Akhil…
By: ajayshripad on डिसेंबर 17, 2009
at 12:00 सकाळी
Kai Kavita Kelis re “Masta” Vatali,
ajkal tu chan kavita karayala lalayas, chan………
By: anjusha s on डिसेंबर 16, 2009
at 5:40 pm
manapasun aabhara… kaveta mi aadheehi chan karayacho pan tu navtish vachaayala… tashihe tu nasates mhanun tula bhtayach ha parayatn majhya kavita karata…
By: ajayshripad on डिसेंबर 17, 2009
at 12:02 सकाळी