डिसेंबर २००६… मधे प्रायोगिक तत्वावर सुरु केलेले भारतातले पहीले ’बस रॅपीड ट्रांसपोर्ट’. असं वाटायला लागलय की हा प्रयोग पुणेकरांच्या बोकांडीवर बसायला लागला आहे. ह्या बिआरटी मधे १३ कि.मी. चा रस्ता वापरण्यात आलेला आहे. यावत एयर कंडीशंड वोल्वो बसेस धावतात. तिन रुट वापरले गेले आहेत यात. १.कात्रज २.स्वारगेट आणी ३.हडपसर.

आता यात शासनाचा किती फायदा आहे..? हे आपल्याला पहीले समजुन घ्यायला पाहीजे. पहीले तर एयर कंडीशंड वोल्वो बस यावर धावत असल्यामुळे सामान्य नागरीकाची इच्छा असो किंवा नसो, जादा भाडं देउन बस बोर्ड करावी लागते. कारण पि. एम. टी. कर्मचार्‍यांना कुठल्याही माणसाच्या वेळेची कदर नाही. मग तो कुणी म्हातारा असो किंवा स्त्रिया असोत. ते आपल्या मनाने गाडी पळवणार, जर कुणी प्रश्न विचारायची हीम्मत केलीच तर त्यांच्याकडे उत्तर तयारच आहे.. “मग स्वतःच्या गाडीने प्रवास करा”. दुसरी गोष्ट म्हणजे आणी गाड्यांना भरपुर ऍव्हरेज मिळतो म्हणजे इथेही शासनाचाच फायदा.

आज सकाळचीच गोष्ट आहे मी ऑफिस संपऊन घारि जात होतो एक काळ्या रंगाची स्विफ्ट डिझायर, हडपसर जवळ क्रोम मॉल जवळ बिआरटी च्या डिव्हायडर वर चढलेली होती. गाडीचं भरपुर नुकसान झालेलं होतं. आपल्याला माहीत आहे. थोड्या वेळाने हा गाडीवाला टोईंग वाल्यांना बोलाउन गडी घेउन जाणार, त्या आधी पोलिस येउन पंचनामा करणार. पण भुर्दंड कुणाला शासनाला…? नाही.. गाडी मालकाला.

आता तुम्ही म्हणनार चालकाची चुक होती, पण मला सांगा ह्या बिआरटी ने किती रस्ता व्यापलेला आहे…? जवळपास अर्द्यापेक्षाही जास्त. त्यात तुटलेले डिव्हायडर आहेत. एकही ग्लोसाईन काम करेनासं झालं आहे. आता ही सुद्धा चालकाचीच चुक का…? अरे जर आम्हाला जयला रस्ता जर नसेल तर आम्ही पण बिआरटी च्याच मार्गाने गाडी चालवनार. जर वाहतुक पोलीसांनी पकडलच तर १०० रुपये देउन सुटनार, आता मला पोलिस खात्याबद्दल जास्त बोलायच नाही आहे, आणी वाहातुक पोलिस तर सोडुनच द्या. अशी जवळपास सर्व पुणेकरांची मनस्थिती झालेली आहे. बरं यात सर्वात मोठा हात आहे प्रायव्हेट कंपन्यांमधल्या कॅब वाल्यांचा. त्यांना बिआरटी आणी सामान्य रस्ता यातला फरक माहीतच नाही ते नुसत गाडी कशी दामटायची हेच जाणतात. दुसरा नंबर आहे तो, पल्सर आणी यामाहा चालवणार्‍या कारट्यांचा. त्यांना असं वाटतं की कुठलाही रस्ता आपल्या तिर्थरुपांनीच बांघलेला आहे. मग ते स्वारगेट असो की सिंहगड रोड असो. आणी त्यातल्या त्यात जर एखादी कन्यका जर मागे बसलेली असेल तर मग हे त्या टु व्हिलर वर बसलेले असतानाही बोईंग ७४७ मधे बसलेले असल्याचा अभाव आणतात आणी अश्या प्रकारे गाडी पळवतात की, बघणार्‍याचा जिवही वरखाली होतो.

बरं या सर्वात कुणी सामान्य नागरीकांची पर्वाच करत नाही. ज्या ठीकाणी बस स्टॉप आहेत त्या ठी काणी जवळपास आठ फुटांचा रस्ता पार करुन त्या बस स्टॉप वर यावं लागतं. सकाळी ८ ते दुपारी १ वाजे पर्यंत ह्या रस्त्यांवर इतकी गर्दी असते की माझ्या सारखा धट धाकट माणुस सुद्धा रस्ता पार करु शकत नाही, आणी करायचा म्हटल्यास जिव हातात घेउनच करावा लागतो. बाय द वे मला हे आज पर्यंत न उलगडलेलं कोडं आहे, की हे पीएमटी चालक स्वतःला काय समजता…? फॉर्म्युला वन ड्रायव्हर…? अरे इतकी जवळ आणुन बस थांबवतात की वाटतं थोडा जर निशाना जर चुकला तर गेलाच समजा आपला हत किंवा पाय. अरे कधी-कधी तर सरळ अंगावर गाडी घालतात. हात दाखवल्याशीवाय गाडी थांबवत नाही. दे आर सपोज टु स्टॉप ऍट एव्हरी स्टॉप. पण नाही अरे आजकाल तर म्हातार्‍या लोकांना सुद्धा पुढच्या गेटने चढु देत नाहीत. नाही तेव्हा लोंढा भरतात गाडित नाही तेव्हा हडपसर पासुन स्वारगेट पर्यंत गाडी रिकामी नेतात. याचा काय अर्थ.

जेव्हा सर्वांना माहीत आहे की या बिआरटी मुळे पुण्यातल्या नागरिकांना काहीच फायदा झालेला नाही तर मग कशाला बिआरटी केलय. खर सांगायच झालं तर आधीही स्वारगेट ते कात्रज जायला ३५ मिनिटे लागायची आणी आताही तितकीच लागतात. बरं ह्या हडपसर रोडवर बिआरटी रोडच्या मधे इतके मोठे डिव्हायडर लावले आहेत, त्यानंतर सायकल वाल्यांसाठी वेगळा रस्ता केलेला आहे, पाई चालणार्‍यांच काय. का फक्त बिआरटी आणी पाई चालणारेच आहेत का पुण्यात…?

दर दिवसाला सोलापुर रोडवर ऍक्सीडेंट्स होतायत, त्यासाठी प्रशासन काय करतय..? काहीच नाही. आणी आता सिंहगड रोडला बिआरटी जोडणार आहेत असं मी ऐकलयं. अरे जरा या शासकीय अधिकार्‍यांना म्हणा की जरा दोन दिवस संतोश हॉलच्या चौकात सायंकाळी ६ ते ९ च्या दरम्यान टु व्हीलर वर जाउन दाखवा. मग म्हणतो खरच “है दम…?” अरे कीती पैसा बळकावणार. बस झालं आता, आम्हाला नावं घ्यायला मजबुर करु नका… वेळीच हे बिआरटी नावाचं कुत्रं आवरा.. नाहीतर परिणाम फार वाईट होतिल….

Posted by: ajayshripad | डिसेंबर 18, 2009

कुठेतरी कशीतरी भेटना तु…!

कुठेतरी कशीतरी भेटना तु
रोज येते कॉलेजात बघत नाहीस तु
मुलींच्या घोळ्क्यात बसतेस
कधीतरी माझ्याशीही बोलना तु

कुठेतरी कशीतरी भेटना तु
रोज दिसते बसस्टॉप हसत नाहीस तु
तिसर्‍या विंडोसीट वर बसतेस
कधीतरी माझ्याजवळही बसना तु

कुठेतरी कशीतरी भेटना तु
दर शुक्रवारी मंदीरात येतेस
सर्वांना आठवणीने प्रसाद देतेस
कधीतरी मझ्या हातवरही प्रसाद ठेवना तु

कुठेतरी कशीतरी भेटना तु
बघते रोज मला लपुन-लपुन
दमलो मी आता वाट बघुन-बघुन
छळु नकोस आता अशी दुरुन-दुरुन
रोज रात्री स्वप्नात माझ्या येतेस
आता तरी एकदाची माझ्या आयुष्यात येना तु.
Posted by: ajayshripad | डिसेंबर 17, 2009

आता तु घरी नसतेस….!

आता तु घरी नसतेस
घरी जाताना उरात धडकी भरते
दारातली तुळस सुकलेली असते
आणी मोगराही बहरत नाही.

आता तु घरी नसतेस
घरी जाताना विचार पडतो
कुणासाठी गजरा घेउ
जुन्या गजर्‍यांचा आजुनही वास आहे घरात

आता तु घरी नसतेस
घरी जाताना मन गलबलतं
जिथे तुझे पैंजण छम-छम करायचे
तिथे आता खंडीभर धुळ पसरलिये.

आता तु घरी नसतेस
घरी जाताना डोळ्यात पाणी येते.
तु दारात उभी असायची वाट पाहत
आता फक्त भकास घराच दरवाजा वाट पाहतो.

आता तु घरी नसतेस
घरी जाताना जिव तुटतो
तुझे नाजुक हात आठवतात मला
ज्यावर मेहंदी फक्त माझ्यासाठीच खुलायची.

Posted by: ajayshripad | डिसेंबर 16, 2009

आनंदी आनंद गडे..!

गेले तिन दिवस मी जरा कमी जेवण करतोय

आमची मेस बंद आहे म्हणुन.

बड-बड खुप जास्त चालली आहे

कसला विचार न कराता मी बोलतोय ऑफीस मधे.

किती दिवस झालेत गाडी पळवली नाही

धुळ खात पडलेली आहे दारात माझ्या.

मी निर्लज्ज झालोय, मला गाडी पुसाविही वाटत नाही.

आज काला दर आठवड्याला सलुन मधे जाउन

दाढि करण्या ऐवजी मी डोक्याची चकोटी करतोय.

काम काही नाही असं म्हणतोय, घरात कपड्यांचा

ढिग लागलाय पण धुण्याची इच्छाच होत नाहीये.

सिगरेट सोडुन ३ महीने झालेत तरीही,

रुम मधला ऍश ट्रे तसाच आहे,

कुणालातरी भेट म्हणुन द्यावा याचाच विचार करतोय मी.

रात्रभर शीफ़्ट करायचा आता कंटाळा येतोय.

किती दिवस तेच जेवण, तोच रस्ता, तिच गाडी, तेच काम…?

नाईलाज झालाय तेच ते चेहरे बघायचा.

या लोकांना का नाही येत तेच ते काम करायचा कंटाळा.

सुंदर दिसणे हा प्रत्येक माणसाचा अधिकार आहे

पण तुम्ही सुंदर दिसता याचा गर्व न केलेलाच बर

म्हणतात ना गर्वाचे घर खाली.

तसही आजकाल माझं घर खाली-खालीच आहे.

खुप गर्दी असते भोवताली तरीही एकटं-एकटं वाटतं.

परवा बॅरीअर मुव्ही बघितली

काय सुंदर काम केलय सर्वांनी त्यात.

स्टोरि लाईन पण खुप छान आहे.

वर्थ वॉचींग वन्स…..

हो ना आता तर असच चालणार.

कधीही घरी यायचं आणी कधीही जायचं.

जगण्याचा अर्थ शोधायला मी काही मोठा महान आत्मा वगेरे नाही

तरीही जर कुणाला सापडला तर त्याने संपर्क साधावा.

Posted by: ajayshripad | डिसेंबर 16, 2009

रोज सायंकाळी ती मला भेटायची……!

 

रोज सायंकाळी ती मला भेटायची,

मोगर्‍याचा गजरा आणी डोळ्यात काजळ लाउन.

दिवसभरचा थकवा एका क्षणात पार कुठेतरी पळायचा

आणी उरायचा तो फक्त मंद-मंद मोगर्‍याचा सुवास.

 

रोज सायंकाळी ती मला भेटायची,

गर्दीत वेगळीच उठुन दिसायची.

तलम रेशमी ओढणीला तिच्या स्पर्श होताच,

प्राजक्तांच्या फुलासारखी भासायची.

 

रोज सायंकाळी ती मला भेटायची,

घाई-घाई यायची आणी लवकर जाते म्हणायची.

मी बळेच तिचा हात धरल्यावर,

लाजुन चुर-चुर व्हायची.

 

रोज सायंकाळी ती मला भेटायची,

जरा वेळ जवळ येउन बसायची.

अंधार पडायला लागला की,

रानात एकट्या सापडलेल्या हरणीसारखी घाबरायची.

 

आता सायंकाळी मी एकटाच असतो,

मनातल्या आठवणींना उजाळा देत असतो.

तिच्या आठवणी कधी संपतच नाहीत,

लपुन राहतात मनाच्या कोपर्‍यात कुठेतरि…..

 

 

 

टिप: माफ करा इथे कुणाच्याही भावना दुखवण्याचा प्रयत्न नाही. मनात जे काही विचार चालले आहेत ते लिहतोय. ज्यांना काही आवडलं नाही त्यांनी कमेंट टाकु नये. आणी जर कुठलीही भलति सलति कमेंट जर आलीच ती मी नक्कीच डिलीट करणार. हे लिहताना मी जराही डोक्याचा वापर ज्याला म्हणतात ते केलेलं नाहेये, म्हणुन जास्त विचार न केलेलाच बरा. टिप लेख लिहायच्या पहीले लिहलिय यावरुन तुम्ही विचार करु शकता..

 

 

 

असा मी कुठेतरी भटकतोय , काय करू …? ताई मला भूक लागली आहे, जेवायला वाढ … डोक्यात मुंग्या येतायत… वाचवा काका मला वाचावा … ! बिनबुडाचे अदेलाताट्टू आहेत सगळे … काय म्हणाव या लोकाना … डोक्याचा भुगा झाला… पिंटू तिथे बासु नकोस …. टिव, टिव, टिव, टिव…. आता काय करु मी..? बरं कुणी ऎकत पण नाही माझं. अरे  तिथे जाउ नकोस.. आत्ताच तर ती गेलि होती परत कशी काय आली.. कोण बाबुलनाथ दुर्गीचो झील ना रे तु..? मानु तु मला दगा दिलास..! आता हे काय नवीन. उगाच फोटो काढतोय तो. काय मग उद्या काय करणार आहेस..? ऐ मला दहा रुपये देना.. दादा स्मोक है क्या? काय भाउ मि सोडली ना…! दादा बरेच दिवस झाले दिसले नाही तुम्ही.. हा मेलबर्न मधे मजा आहे बाबा. आता नाताळ आणी नविन वर्ष तिथेच का..? बरं मी काय म्हणतो गणु तु बोलला का तिच्याशी…? मग काय म्हणाली… माहीत नाही म्हणजे काय, अरे काही तर बोलली असेल… हो, नाही अरे काही तर म्हणाली असेल.. अरे असं कसं…? बरं मि फोन करतो उद्या.. बिल भरलं का रे…? का नाही भरलंस अरे फोन बंद होइल ना मझा. अरे पैसे दिले होते ना मी… मग.. कसे काय खार्च झाले… बरं ठिक आहे हे घे पण उद्या नक्की भर, प्लिज यार बंद होइन ना. चल मंदिरात जऊन येउ… आता काय करयचं.. अरे मला फार भुक लाग्लेली आहे. चल ते बघ तिथे भजी छान मीळतात. चल खाउया.. बर मी काय म्हणतो, पुढच्या महीन्यात गावला जायचं का,,? अरे दादाचं लग्न आहे २५ तारखेला हा कपिल काही सुट्टि देत नाही ना राव.. मग…? एल डब्ल्य़ु पी, नको रे तो आधिच चिडलेला आहे माझ्यावर. झोप येतेय. जेवण कसं मिळतं राव या कंपनीत. अरे फुकट नाही देत ना.. पैसे घेतात जेवणाचे.. लाजा सोडल्यात यांनी.. अरे क्रिष्णा कोणा कोणाला बदलणार तु.. अरे ह्या सिस्टम ला बदलता बदलता खुप लोक एकतर स्वतः बदलले अन नाहीतर संपले… यु हॅव टु किल द रुट फर्स्ट… मग काही तरी करता येइल. अरे इतके किती हे लोक निर्लज्ज…? या नेत्यांना तर भर चौकात चपलीने बडवायला पाहीजे. मग येतिल हे जागेवर.. हा ना.. अरे हे रॉंग नंबर मलाच का येतात यांना दुसरे नंबर मिळत नाहीत का कॉल करायला. आता काय करत असेल ती..? माहीत नाही. डोकं नको खाउ यार… अबे लेका तुले डोकं हाय का? मग आहे ना हे बघ… टक्कल केलय ना मी त्याच्यासाठी. काय करु सांगुन पाहु का बाबांना ऎकतिल का ते माझं.. तिथच त लोच्या आहे लेका..! म्हणजे..? तुझ्या खोलित जाउन बस बरं तु.. अरे ती जि आय जो मुव्हि बघितलीस का तु… अरे एक नंबर.. जबरी जबर शीवाजी नगर,,, नाही का..? हव ना गड्या….! शरद्या काल पोरगी पाहायले गेला होता.. मग मी काय करु..??? योग्या बी गेलता मांगच्या मयन्यात…! तु गप बस रे… डोक्यात मुंग्या येतायत,,, बस रे चुप… कॅबचा फोन आला, आता दोन मिनटात गाडी येइल.. अबे जवन करुन जानं…! नाही यार भुक नाही… या ऑफीस मधे काम करायचा कंटाळा आलाय… अरे मॅनेजर आहे तर मग काय डोक्यावर चढुन नाचनार काय…? अरे किती ओरडतो हा फ्लोर वर याचा घसा फाटत नाही का? अरे येडा है वो तु क्यु उसके नादी लगता..? जाऊ दे आता… तसंही मी आता जास्त दिवस या आय टी इंडस्ट्रित जास्त दिवस काम करणार नाहीये. मग मी कशाला नादी लागु..! मांम्स यु आर ग्रेट..! हा रे बाबा आय एम ग्रेट फ्रॉम चाईल्डहूड…! शरद दाहा मिनिटात घरी येतोय.. खाली ये चाहा प्यायला.. राव तो हॉस्टेल मधे तो नवा जुनीयर आर्टीस्ट आलाय त्याला सांग दुपारि रिहर्सल नको करत जाऊस मी नाईट शीफ्ट करतो यार… दिवसभर याच्या डायलॉगबाजी मुळे झोप येत नाही राव…! गणपती बाप्प मोरया…..!

टिप: बस झालं खुप लिखाण… लाइफ सक्स…..! आय एम लिट्रली पिस्ड ऑफ. म्हणुन हा नवा प्रयोग. कसं वाटलं नक्की कमेंट टाका..

Posted by: ajayshripad | डिसेंबर 13, 2009

लग्न पाहावं करुन….!

जसं म्हणतात ना घर पाहावं बांधुन तसच, लग्न पाहवं करुन…. नाही का..? अहो किती लग्नांचे मुहूर्त. गेल्या तिन आठवड्यांपासुन जवळस १० इनव्हिटेशन्स आलेले आहेत. त्यातल्या त्यात काही लग्न रविवारी असतात म्हणजे जाणं भागच, नाहीतर मित्रं म्हणतो, काय रे आता रविवारी सुध्धा काम करायला लागलयस का…? आता यांना कोण सांगणार की मी सरकारी नोकरी करत नाही. आम्हाला सर्व वार सारखेच.

बरं सांगायचं झालच तर हा विषय यासाठि काढला, आज माझा कॉलेजचा मित्र राहुल भेटला. दुपारी काही कामसाठि त्याला फोन केला होता त्या वेळी तो फोनवर एवढच बोलला की नंतर कॉल करतो. तसा हा खुप बिझी वगैरे नसतो पण सारखा ऑफीस टुर वर बाहेरगाविच असतो, मी म्हटलं असेल कुठेतरी बाहेर म्हणुन फोन करेल नंतर असं बोलला, पण काही वेळानंतर याचा परत फोन आला त्याने विचारलं कुठे आहेस, मी म्हणालो, घरी आहे मी, तर हा म्हणतो कसा “तु घरपेच रुक मै आया १० मिनट मे, तेरेको खुशखबरी देनी है।” आता मी म्हटलं हे काय नवीन. पंधरा-विस मिनीटात तो घरी आला, त्यानंतर त्याने बातमी दिली, “अरे भाय मैई शादी कार लिया….!”

क्या बात है…! राहूल सारखा मुलगा ज्याची चिंता त्याच्या घरच्यांनी सुद्धा सोडली होती, आणी आम्हाला वाटल होतं की हा कधी लग्न करणारच नाही, तो आज लग्न करतोय. मला ईतका आनंद झाला की मी सांगुच शकत नाही. अरे बातमिच तशी आनंदाची आहे.

पण आज पहील्यांदा राहुलला मी सिरियस पाहीला. आपल्या आयुष्याबद्दल सिरियस.! हे असं कसं काय होतं? अरे माणुस एका-एकी कसाकाय इतका सिरीयस होउ शकतो? कसा काय इतका विचार करु शाकतो? मला या गोष्टिचे उत्तर अजुन भेटायचे आहे. माहीत नाही केव्हा मिळणार ते, पण हो मिळेल.

लग्न किती छोटा शब्द पण किती मोठा अर्थ..! यात फक्त दोन जिव एकत्र येत नाहीत तर दोन कुटंब एकत्र येतात. कितीतरी नविन नाते जुळातात. नवनविन अनुभव येतात. कितीतरी नवीन गोष्टी शीकायला मिळतात. तसं पाहील तर प्रत्येक माणसाने त्याच्या आयुष्यात एकदा तरी लग्न अटेंड केलेलच असतं, नाही का? हो ना आता मलाच पहा, मला लहापणापासुन लग्नात जायची भारि हौस. जेव्हा लहाण होतो तेव्हा बाबांसोबत जायचो लग्नात. मस्त वाटायचं नविन कपडे घालायचे, नवनविन पदार्थ खायचे. बस यापलीकडे आम्हाला लग्न हा काया प्रकार आहे हे माहीत नव्हतं. नंतर जस जसा मोठा झालो तेव्हा मित्रांच्या भावांचे लग्न किंवा बहीणींच्या लग्नात जायचो. हा पण याय फरक होता, जर मित्राच्या भावाचं लग्न आहे तर मोठ्या थाटात आम्ही लग्नात नवरदेवासोबत फिरायचो, पण जर का बहीणीचं लग्न आहे तर खुप जिव तोडुन काम करायचो. तिथे मग एक दिवस आगोदर जायचं आणी लग्न उरकल्यावर दुसर्‍या दिवशी घरी जायचं. हाती सापडेल ते काम करायचं. कारण माहीत होतं मित्र गरिब आहे. जितकी मदत करता येइल तितकी करायची. त्य वेळी हे केटरर्स वगेरे काही प्रकार नव्हता. लग्न लागलं की, शर्टाची बाही मागे करायची, पॅंटला फोल्ड मारायची, झाडु हाती घ्यायचा, आणी पुर्ण मांडव झाडुन काढायचा. मग पट्ट्या टाकल्या की, पंगतीवर-पंगत उठायची त्यांना वाढायचं काम आमचंच. त्या वाढात काही मान-पानाचे लोक बसले असतील तर तिन-तिन वेळा विचारायचं “काही वाढु का तुम्हाला?” इकडे आम्ही दोन दिवस झालेत लेको काही खाल्ल नाही तरीही उत्साह म्हणसाल तर गगनाला भिडलेला असायचा.

त्या वेळी नेमकी लग्नं उन्हाळ्यात काढायचे. त्यातल्या त्यात मे महीन्यात. आता तुम्हाला काय सांगु विदर्भातला उन्हाळा…

त्यात पाण्याची सोय नाही तरीही आम्ही कधीच कोणत्या मित्राला याची जाणीव होऊ दिली नाही. माहीत त्यालाही असायचं की आपले मित्र काल रात्रभर पाणी भरत होते. बरं या सगळ्यात आमची तहान भुक कुठल्या कुठे पार पळुन जायची.

त्या वेळी जास्त वीचार नव्हतो करत आम्ही, आत लग्नाचं वय झालं, जबाबदारी काय असते ते समजायला लागलं. आता हे कळतय की गळ्यात मंगळसुत्र घातलं, आणी सात फेरे घेतले म्हणजे जालं नाही लग्न. भरपुर विचार करावा लागतो, खुप प्लानींग्स असतात, घर घेतल्यापासुन, तर मुलांच्या शाळेपर्यंत.

म्हणुन म्हणतो “लग्न पाहावं करुन….!”

Posted by: ajayshripad | डिसेंबर 12, 2009

तुझीच आठवण येते…..!

 

मी चालत असताना पाय अचानक थांबतात

कुठुन तरि ओळ्खीचे शब्द कानावर पडतात

ह्रदयाचे ठोके हळुहळू वाढतात

मन आणी डोळे दोघंही मागे वळुन पाहतात

त्या आशेच्या नजरेनं मागं वळुन पाहताना

मला तुझी आणी फक्त तुझीच आठवण येते

 

त्या दिवशी मी जरा जास्तच घाईत होतो

गर्दी असतानाही ट्रेन मध्ये शीरलो होतो

अचानक कुणीतरी ओळ्खीचं वाटलं

तोच तो चेहरा पाहील्या सारखं भासलं

उशीर झाला तरी चुकीच्या स्टेशनवर उतरताना

मला तुझी आणी फक्त तुझीच आठवण येते

 

नको असतानाही मित्र फिरायला घेउन जातो

एकांत हवा असतो पण मैत्री पुढे ईलाज नसतो

विसरता यावं तुला म्हणुन मिही त्या गर्दीत शीरतो

शोधतो त्या माणसांत एखादा ओळखीचा चेहरा

त्या लाखोंच्या गर्दीत ही मि एकटाच फ़िरताना

मला तुझी आणी फक्त तुझीच आठवण येते

 

दिवसा उजेडात स्वतःला सावरताना

सायंकाळी सुर्य अस्ताला जाताना

रोज रात्री जागरण करताना

पांघरुन घेवुन आसवं ढाळताना

जेव्हा मी स्वतःलाच जळताना पाहतो

तेव्हा ही मला तुझी आणी फक्त तुझीच आठवण येते

Posted by: ajayshripad | डिसेंबर 12, 2009

व्यक्ती आणी वल्ली गणेश चितोडे……!

 

म्हणजे काका आमचा णा शाळेतला दोस्त गणेश…..!

मी कॉलेजात याला भेटलो. भेटलो म्हणजे हाच मला भेटला, मी कॉलेजमधे कमी आणी बाहेर कट्ट्यावर जास्त असायचो, त्या वेळी आम्ही एक्सटर्नल म्हणुनच कॉलेजत जायचो. कारण एकच, काम करुन घर चालवायचं होतं. जो पर्यंत मी या गणेशला भेटलो नव्हतो तोपर्यंत मला असं वाटायचं की आयुष्यात फक्त मिच खुप जास्त कष्ट घेतलेयत, पण जेव्हा हा मला भेटला तेव्हा मझा भ्रम तुटला. मला माझ्या आयुष्यात असे लोक फार कमी भेटलेत. कधी-कधी असं वाटतं कुठल्या मातीचा बनलाय हा गणेश. एकदम सडपातळ बांधा, नेहमी शर्ट ईन केलेला, (टि-शर्ट सुध्धा) चालायची वेगळीच तर्‍हा.  नेहमी बागेत चालल्यासारखा बागडत असतो. वयाने माझ्यापेक्षा मोठा पण माझा लहाण भाउ असल्यासारखा वागतो. हा पण याच्या दिसण्यावर तुम्ही जाऊ नका हा जितका बारिक दिसतो ना तितकेच मोठे-मोठे कामं करण्यात याचा हात आहे.

हा याला समाजसेवा करायचं एक वेगळंच खुळ आहे यासाठी मिही याला कधी थांबवत नाही. देवधर्म करण्यात सर्वात पुढे. आम्ही याला चीडवण्यासाठी कधी-कधी “दुनियादारी” असंही म्हणतो. पण याचा राग हा फार काळ टीकत नाही. आणी मला जास्त लोणी लावायची गरज पडत नाही. हा लवकर पिघळतो जास्त वेळ राग धरुन ठेवत नाही.

थोडासा वेडा आहे कधी-कधी मलाही समजत नाही काय करतोय ते, गेल्या निवडणुकांच्या आदल्या दिवशी लक्ष्मी रोडवर कसलेतरी बॅनर घेउन उभा होता. दुसर्‍या दिवशी टाइम्स ऑफ इंडीया मधे साहेबांचा फोटो. नंतर माहीत पडलं बॅनर वर लीहलेलं होतं “वन वोट फॉर द नेशन”. असा आहे आमचा गणु. याच्या कितीतरी गोष्टि आहेत सांगायला. मी जेव्हा अकोल्याच्या कॉलेजात होतो तेव्हा हा माझा क्लासमेट होता मी मुलांसोबत राहायचो आणी हा मुलींसोबतच दिसायचा त्या वेळी आम्ही फार चीडायचो, पण नंतर समजले की याला सवय आहे, दिसेल त्या पोरिला बहीण बनवायची..!

पुढे मी कॉलेज सोडुन पुण्यात आलो, हा तिथेच राहीला. त्यानंतर याच्याशी कॉन्टॅक्टच राहील नाही. बरिच वर्ष पण हा नेहमी मझ्या घरी जायचा. आई-बाबांना भेटुन याचा, खास करुन आईसाठी डायबिटीजची दवाई घेउन जायचा. त्या वेळी हा आकोला सोडुन वाशीमला राहायला गेला होता. आर्मर फार्मा म्हणुन कंपनीत एम.आर. म्हणुन काम करायचा. तिथेही खुप मित्र बनवले याने, आणी खुप सारे नातेवाईक सुद्धा.

नंतर काही वर्षांनंतर हा पुण्यात आला. का आला कसा आला मला काहीच माहीत नव्ह्ते. नशीबाने त्या वेळी मी आमच्या एका कॉमन मित्राबरोबर राहायचो. त्या दिवशी मी नाईट शीफ्ट करुन आलो तर साहेब माझ्याच बेडवर झोपलेले होते, तसं मला मझा बेड जर कुणी शेयर केलेला आवडत नाही. त्या वेळी मझ्या मित्राने मला सांगितले अरे हा गणेश आपला कॉलेज मधला मित्र. त्या नंतर बरेच दिवस याने कष्टात काढले. एच डि एफ सी बॅंकेत नोकरी मिळाली पण नेहमी पाई फीरायचा. मनापासुन दुःख होत होतं, पण एक मन म्हणत होतं की याला आता नही कळणार तर मग कधी.

म्हणतात ना कि सोन्याची परख आगीतुन गेल्याशीवाय होत नाही, तसच याच्या सोबत घडलं. मला खुप लोक भेटले, ते म्हणतात ना ’बोहोत आये ओर बोहोत गये’ पण गणेश एकच आहे हे मला मान्य करावे लागेल. कारण हा कधीच दुर झाला नाही ना कधी याने साथ सोडली. हा नेहमी माझ्या सोबत होता, मझ्या चांगल्या वेळात आणी वाईट काळातसुद्धा.

मी जास्त काही सांगु शकत नाही पण जीतके लिहणार ते कमीच. “गणेश य़ू आर दी बेस्ट……….!”

Posted by: ajayshripad | डिसेंबर 10, 2009

अनोळखी ओळख…..

बरेच दिवस झालेत काही सुचतच नाही, काय करावं डोक्यात भलतेच विचार येतात, काही करावंही वाटत नाही. कदाचीत माझी विचार करण्याची ताकत जरा कमी झाली असावी असं वाटतय. का पण असं का झालं याचं उत्तर मालाही माहीत नाही, आणी कारण जाणुन घेण्याची मी कधी उत्सुकताही दाखवली नाही.


लोक आपल्या आयुष्यात येतात-जातात, काही काळ थांबतात, जशी गाडी कुठल्यातरि अनोळखी स्टेशन वर थांबते, आणी वेळ झाली की जोरात शीटी वाजवुन निघुनही जाते, पण या मधल्या वेळात जे नते जुळतात, ते जसे जुळतात तसेच विरुनही जातात. कारण जाणार्‍यांना कुणीही थांबवु शकत नाही, पण जेव्हा ही गाडी फलाट सोडुन जात असते त्या वेळी काळजात चर्र होतं, आणि पोटात गलबलायला लागतं. न सांगता बरच काही कळुन चुकलेलं असतं, आणी आपण काहीही करु शकत नाही या जाणीवेमुळे मन कुठेतरी खोल चडफडत असतं.


आपल्या भोवताली रोज किती तरी लोक येतात-जातात काही फार जवळ येतात काहींसोबत ओळख असुनही जवळ करायची इच्छा होत नाही, यामागे एक कारण आहे, कारण असे की काही लोक आपल्याला पहील्या भेटीतच मोहीत करतात. काहींसोबत पुर्ण आयुष्य राहुनही जवळीक होत नाही. काही जातात तर मोठी जखम करुन जातात तर काही जातात ते जीवाला चटका लाउन जातात. मोठ्या-मोठ्या जखमा भरुन निघतातही पण हे चटका लाउन जाणारे फार वेगळे असतात, ह्या जखमा कधिच भरुन निघत नाहीत त्या सारख्या बोचत राहतात, जसं एखाद्या पायत रुतलेल्या काट्यासारखं त्याचं कुरुप होउन आयुष्याभर ते पायात सलत राहतं.


माझा कुणाला दुःखवायचा प्रयत्न नाही, तरीही का म्हाणुन भेटतात आपल्याला नविन लोक, का म्हणुन जवळ  येतात, जवळ यतात तर येतात पतर जातातही. कही तर न सांगताच जातात. काही तेवढे सांगुन दुर जातात. पण मला असं वाटतं हे न सांगुन जाणारेच कधी-कधी बरे वाटतात कारण ते गेल्यावर आपल्याला दुःख होतं पण तोर्यंत ते फार दुर गेलेले असतात काही करुणही काही उपाय नसतो आणी आपण काही करुही शकत नाही. पण हे सांगुन दुर जाणारे फार त्रास देउन जातात. कारण त्यांच्या जाण्याच्या मधे जो काळ असतो त्या काळात आपण त्यांच्याशी जाउ नकोस म्हणुन भांडण्यात वेळ घालवावा की, उरलेल्या वेळात, प्राजक्तांच्या फुलांसारखे उरलेले क्षण वेचावे हेच कळत नाही. कारण आता वेळ हाततुन वाळुसारखी केव्हाच घसरुन गेलेली असते, आता तर काय बोलावं हे सुद्धा सुचत नाही, कारण बोलायला काही उरलेलेच नसते. ती व्यक्ती ज्या वेळी समोर येते तेव्हा मनात अचानक एक कळ उठते, आता रडु फुटेल असं वाटत असतं, पण नाही रडं येणार कुठून डोळ्यातलं पाणी तर आधीच आटलेलं असतं आणी त्यात हे थंडीचे दिवस. हा या थंडीत झालेली जखम बसते लवकर पण त्रास मात्र खुप जास्त होतो. बरं हे लोक जाताना बर्‍याच आठवणीही देउन जातात रंगबीरंगी आठवणी, काही गोड, काही कडु, काही कडु, काही तुरट आणी काही तिखट असतात. जसं मागच्या वर्षी घातलेल्या लोणंच्याची बरणी अचानक फुटते मग त्या दिवशी त्या लोणच्याची गोडि कळते पण आता काहीही करण्याच्या  पलीकडे गेलेली असते गोष्ट.


खरं सांगु का मलाही कळत नाहीये की मी काय लिहतोय ते. तसंही आज खुप डोकं दुखतय. ओफीसमधे आल्यापासुन काहिही सुचत नाहीये. तर मी पुरे करतोय लेख. लवकरच काहीतरि नविन लिहणार आहे पण आज माफ करा…..

जरा जुन्या पोस्ट्स »

प्रवर्ग